वाई मध्ये पार पडला दि वाई मिस मिसेस व मिस्टर फॅशन शो २०२२……..
पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे-वरुडे ठरल्या फर्स्ट रनर अप……..
क्रीएटीव्ह कॉर्नर व दिशा वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि वाई मिस, मिसेस आणि मिस्टर फॅशन शो २०२२ प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. वाई सारख्या शहरातील महिला, तरुण व तरुणींकरीता एक व्यासपीठ व त्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सुंदरतेसोबतच निरोगी आरोग्य हे तितकच महत्वाचे आहे आणि त्यासाठी मल्लखांब या खेळाचे प्रशिक्षण दिशा स्पोर्ट्स अकॅडमि यांच्या मार्फत सुरु झाले असल्याचे दिशा वेलनेस चे नितीन कदम सर यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.स्पर्धेचे उदघाटन दिशा वेलनेस चे नितीन कदम सर, ऑल इंडीया फिटनेस चे वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार अर्जुन सुसे , जागतिक आरोग्य सल्लागार रवींद्र वेताळ , सेंट थॉमस स्कुल चे मुख्याध्यापक रुपेश सिंग , मधू फुटवेअरचे मनोज राम व दीपक राम , रॉयलवे चे अमर कोल्हापुरे , चंदूकाका सराफ यांचे सागर घोरपडे व अजिंक्य यादव , वैभव ज्वेलर्सचे वैभव धामणकर , उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्ष अनुराधा कोल्हापुरे, ओम डिस्ट्रीबुटर्स यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या स्पर्धेतील मिस दि वाई फॅशन शोची विजेती मयुरी गाढवे , फर्स्ट रनर अप डिम्पल विश्वकर्मा , सेकंड रनर अप सुस्मिता धुमाळ. मिसेस दि वाई फॅशन शो २०२२ च्या विजेत्या अयोध्या माने, फर्स्ट रनर अप पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे-वरुडे मॅडम , सेकंड रनर अप जयु खरात , तर मिस्टर दि वाई फॅशन शो चे विजेते प्रथमेश काटकर फर्स्ट रनर अप संग्राम नलावडे , सेकंड रनर अप आदित्य गायकवाड यांनी पटकावले. यादरम्यान सायबरतज्ञ रोहन न्यायाधीश यांचा युवा उद्योजक म्हणून तर डॉ. राजस नित्सुरे यांचा युवा संशोधक म्हणून सन्मान देखील करण्यात आला.सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीएटीव्ह कॉर्नरचे अध्यक्ष प्रणव गुजर, परेश लाड, भाग्यशाली अनुप राऊत, उज्वला कांबळे व रंगता बेडेकर यांनी मेहनत घेतली