रोहितदादा पवार यांचा मदतीचा हात मिळाल्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण
महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील सराफवाडी गावच्या हद्दीत असणारा पुरातन वाघाळे तलाव दुरुस्ती करण्यासाठी , गावातील नागरिकांची मागणी होती . त्यानुसार सर्व माहिती आमदार रोहित पवार यांना आम्ही कळवली . गावाची शेतकऱ्यांची नस ओळखून तलावाचे काम करण्यासाठी मशीन खोदाईसाठी निधी लगेच उपलब्ध करून दिला , त्यामुळे वाघाळा तलावाचे काम करता आले अशी माहिती बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी दिली .
सराफवाडी येथील वाघाळा तलावाचे जलपूजन बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते पार पडले . यावेळी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक किरण बोरा , पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले , राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर , सराफवाडी गावचे सरपंच सुखदेव बाबर , तंटामुक्तीचे अध्यक्ष संदीप माने , विष्णू सूर्यवंशी , दत्तात्रेय बाबर , शब्बीर शेख , चांगदेव सूर्यवंशी , निलेश जाधव , भिमराव लोंढे , हनुमंत लांवड,लव्हू भापकर , राजु बावकर , गावचे ग्रामसेवक सचिन पवार , दादाराम जाधव , यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .
पुढे बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की,सराफवाडी गावात पहिल्यांदा तीन वर्षापूर्वी आले होते . या गावाचा महत्त्वाचा विषय होता ते म्हणजे पाणी , त्यामुळे येथील पुरातन असणारा वाघाळे तलाव या तलावाच्या माध्यमातूनच पाच गावांचा पिण्याचा पाणीप्रश्न अवलंबून होता.पाणी प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे , मी तात्काळ आमदार रोहित पवार यांना फोन केला व तात्काळ पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी रोहित पवार यांनी या तलावाची खोद कामासाठी रोहितदादा यांनी मदत केेली.तसेच जवळपास २५ गावांमध्ये या मदतीच्या जोरावर कोट्यवधी लिटर पाणी आज साठवता आले आहे .
बारामती येथील आमची संस्था एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट माध्यमातून हे काम पूर्ण झाले . काम करताना खूप मजा आली , गावांमध्ये एवढे – तेवढ हेवेदावे होते.मात्र हे काम पूर्ण झाले . गावाच्या पाण्यासाठी कष्ट करणारा , श्रमदान करणा-या मधूनच गावाला शाश्वत पाण्याचे स्रोत निर्माण करणं हे काम या गावकऱ्यांनी केल्यामुळे , पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यात दुसरा क्रमांक सराफवाडी गावाने मिळवला आहे,याचा मला अभिमान वाटतो .
पाणी हे जीवनत खूप महत्त्वाचे आहे . जरी आता खुप असले तरी ते वापरले पाहिजे . या वर्षी भरपूर पाऊस पडला असला तरी देखील पुढल्या वर्षी पाऊस येईल अशी शक्यता नाही . त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती ठिबक द्वारे सिंचित करावी . अतिरिक्त पाण्याचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होतो . हे शेतकऱ्यांनी ओळखले पाहिजे व पाण्याचा वापर कमी करून अद्ययावत शेती करण्यावर भर दिला पाहिजे . असे आव्हान देखील सुनंदाताई पवार यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापुराव जाधव यांनी केले .