डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपणी दत्त निवास, बंगला नं -1सदर बाजार सातारा येथे वास्तव्य होते, येथूनच बाबासाहेब साताऱ्याच्या शाळेत जायचे.
नागपूर -महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग यांचे दि 13/2/2007 च्या अधिसूचने
नुसार CTS-1,सदर बाजार सातारा येथील 4990.90 स्के. मी.जागा राज्य संरक्षित स्मारक साठी संपादित करण्याचे जाहीर केले.
भूमी संपादन विशेष अधिकारी सातारा व नगर रचना अधिकारी सातारा यांनी 15/4/2013च्या पत्रानुसार एकूण क्षेत्रफळ 4999.90 स्के. मी. जागेची किंमत 1कोटी 82लाख 24हजार 574 घोषित केली व शासनाने सदर जागा मूळ मालक यांना विश्वासात नं घेता अधिग्रहित करण्याचे ठरविले. या जागेवर उदय लक्ष्मण आमणे यांचे वास्तव्य आहे. हीं जागा त्यांचे आजोबांची मिळकतीची आहे. या जागेच्या मालकाला स्मारकसाठी हीं जागा शासनाला द्यायची नसल्याने प्रकरण न्यायलयात आहे.
काष्ट्राइब महासंघाच्या शिष्टमंडळाने अरुण गाडे अध्यक्ष यांचे पुढाकाराने उदय आमणे यांची त्यांचे निवास स्थानी सातारा येथे भेट घेतली असता त्यांनी काष्ट्राइब महासंघावर विश्वास व्यक्त करून मध्यस्थी करायाला सांगितले की डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक होऊ द्या. माझे आई वडीलांचे निधन झालेत असून मला उपजिवकीचे कुठलेही साधन नाही माझी आर्थिक स्थिती अतिशय दयनीय आहे म्हणून मला जवळच असलेला प्लॉट CST -no -409/10हीं पर्यायी जागा द्यावी व या जागेचे बाजार भावा प्रमाणे किम्मत मिळाली तर मी सर्व न्यायालयीन प्रकरण मागे घेण्यास तयार आहे. या प्रमाणे शासनाला काष्ट्राइब तर्फे निवेदन देण्यात आले.
आज प्रत्यक्ष नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की,काष्ट्राइब महासघा द्वारा उदय आमणे यांची भेट घेऊन त्यांना बाबासाहेब यांचे स्मारक होऊ द्या, तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही आलो आहोत, उदय आमणे म्हणाले माझी आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे, बाबासाहेबांचे स्मारक व्हावे यासाठी तयार आहॊ . व न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यास सुद्धा तयार असून सदर जागेचे बाजार भावा प्रमाणे योग्य मूल्य व प्लॉट क्र 409/10हा त्यांना द्यावे अशी उदय आमणे यांची मागणी आहे, म्हणून आपणास विनंती आहे की डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घराचे राष्ट्रीय स्मारक साठी आपण पूढाकार घेतला आता बाबासाहेबाचे लंडन येथील राष्ट्रीय स्मारकप्रमाणे सातारा येथेही भव्य राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी आपण पुढाकार घ्यावा , यावर देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित पणे सातारा येथिल डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे घराचे राष्ट्रीय स्मारक उभारणार व लवकरच याबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असे म्हटले याबाबत काष्ट्राइब तर्फे उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले..
या प्रसंगी सीताराम राठोड, अरविंद पाटील, सुषमा कळमकर, प्रगती ताई पाटील सुगत रामटेके उपस्थित होते .





















