Homeजिल्हाविषयकदातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे भिवडी येथील वांढेकर कुटुंबीय बंधूच्या दशक्रिया विधीचा खर्च टाळून विद्यालयाला केली १२५००० रुपयांची मदत
दातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे भिवडी येथील वांढेकर कुटुंबीय बंधूच्या दशक्रिया विधीचा खर्च टाळून विद्यालयाला केली १२५००० रुपयांची मदत
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर )
भिवडी (ता.पुरंदर) येथील शामराव अनंतराव वांढेकर यांचे दि.१७ आँगस्ट रोजी निधन झाले होते . वांढेकर कुटुंबीयांनी कै.शामराव वांढेकर यांच्या दशक्रिया विधीचा खर्च टाळून भिवडी येथील हुतात्मा उमाजीराजे माध्यमिक विद्यालयाला १२५००० रुपयांची मदत केली , अशी माहिती मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे यांनी दिली आहे .यामध्ये ५० इंची एल.इ.डी. टीव्ही संच , १ प्रोजेक्टर व २५००० रु धनादेश 125000 रुपयांची मदत भिवडी येथील हुतात्मा ऊमाजी नाईक विद्यालयाला करुन एक नवीन पायंडा पाडला .
या मदतीबद्दल डॉ.लक्ष्मण अनंतराव वांढेकर , श्रीमती कांताबाई विलासराव भोसले (वांढेकर) मोहन वांढेकर , दादासाहेब वांढेकर व सर्व वांढेकर कुटुंबियांचे आभार संस्थेचे अध्यक्ष श्री.शामकांत भिंताडे यांनी मानले आहेत .
यापुर्वी वांढेकर कुटुंबियांनी विद्यालयाला २००५ मध्ये २ संगणक ,
सन २००९ मध्ये ५०००० रुपयां या खुर्च्या ,
सन २०१० मध्ये शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी व विद्यार्थ्यांना खाण्यासाठी ५५००० रुपयांची भांडी ,
सन २०१५ मध्ये आईचा दशक्रिया विधीचा खर्च टाळून ५१००० रुपये प्रयोगशाळा बांधकामासाठी मदत ,२०१६ मध्ये टेक्नीकल विभागासाठी फ्रिज , सन २०१८ मध्ये विद्यालयाच्या रौप्य महोत्सवासाठी ३०००० रुपयांची मदत , दरवर्षी विद्यालयातील 3 गरीब मुलींचा शैक्षणिक खर्च आदी मदत केलेली आहे .