महाराष्ट्र न्यूज दहिवडी प्रतिनिधी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती , शाळा म्हंटल तर दुर्गम.फारशी कुणाला परिचित नसलेली.पण सौ.भारती आकाराम ओंबासे या उपशिक्षिका म्हणून तिकडे हजर झाल्या अन् शाळेचं नाव हळूहळू पुढे यायला लागले.विद्यार्थी विकासाचे विविध उपक्रम राबवून त्यांनी प्रथम पालकांचा विश्वास संपादन केला.आणि मग एखादा सेट झालेला फलंदाज जसा चौकार-षटकारांची बरसात करतो तसं ओंबासे मॅडमनी एक ना अनेक उपक्रम राबवून शाळेस नावारूपाला आणले.इतकाच काय अगदी ज्या कोरोनाने अवघ्या विश्वाला स्तब्ध केलय तो सुध्दा मॅडमना रोखू शकला नाही. Donate your smart phone या उपक्रमाला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
शाळा बंद पण शिक्षण सुरू ही योजना त्या राबवत आहेत.आपल्या काम करण्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे त्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांच अविरत स्पंदन असं मृत्यूंजय मध्ये म्हटलेले आहे.आपल्यातल्या उत्साहाचा, चैतन्याचा व अनुभवाचा लाभ लहानग्यांना करून देण्यासाठी सतत धडपडणाऱ्या या गुणी शिक्षिकेला माण तालुक्यातील तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने मनपूर्वक सलाम..
खरेतर असे अनेक झाकले माणिक आहेत.त्यांचेही श्रम व योगदान दुर्लक्षित करून चालणार नाही.त्या सर्व ज्ञात अज्ञात गुरुजनांही यानिमित्ताने वंदन