महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
रविवार, दि. ४ आक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हनुमंत अर्जुन हेगडे व अभिजित हनुमंत हेगडे यांनी सुरू केलेल्या ‘ काव्या ‘ फिश फीड या व्यवसायाचा उदघाटन समारंभ संपन्न झाला .
उजनी धरण परिसर आणि इंदापूर तालुक्यामध्ये अशा प्रकारचा व्यवसाय सुरू झाल्याने मत्स्य व्यवसाय करणारे सर्वांनाच याचा फायदा होईल तसेच या व्यवसायामुळे अनेकांच्या हाताला काम मिळेल . तालुक्यातील मत्स्यउद्योग हेगडे परिवाराने सुरू केलेला व्यवसाय नक्कीच मदत करेल . मत्स्य औषधे व मत्स्य खाद्य निमगांव येथे उपलब्ध झालेने आजूबाजूला असणारे शेततळ्याच्या माध्यमांतून मत्स्य व्यवसाय वाढीला लागेल , असे मत व्यक्त करत हेगडे परिवाराचे कौतुक करून त्यांच्या व्यवसायीक वृध्दीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या .






















