सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यातील महात्मा फुले यांच्या खानवडी गावची सोसायटीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमरीन बागवान यांनी काम पाहिले.सोसायटीच्या चेअरमन पदासाठी प्रकाश विठ्ठल होले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता तर व्हाईस चेअरमन पदासाठीसुद्धा एकाच ताराचंद जयवंत नेवसे अर्ज होता.निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ए. एस.बागवान मॅडम यांनी या दोन्ही नावाची घोषणा केली.यावेळी त्यांच्यासोबत सोसायटीचे सचिव गणेश दीक्षित यांनी काम पाहिले. सोसायटीचे सर्व सभासद उपस्थित होते.सोसायटीचे चेअरमन प्रकाश होले व व्हाईस चेअरमन जयवंत नेवसे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.यावेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी संचालक मंडळाला मार्गदर्शन करताना ते म्हणाले की चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी नवीन संचालक मंडळाला सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे.सर्व शेतकरी सभासदांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी मदत करावी.सोसायटी शंभर टक्के भरणा करण्यासाठी सर्व संचालक यांनी पर्यंत करावा.सोसायटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व संचालकांनी प्रयत्न करावा.
गावचे गावपण जपावे.माझी आदर्श सरपंच रवी फुले यांनीही शुभेच्छा दिल्या.यावेळी खानवडी गावचे विद्यमान सदस्य विजय होले,माझी ग्रामपंचायत सरपंच रामदास होले.नितीन होले ,निळुंज गावचे सरपंच गणेश होले,जेष्ठ नागरिक जयवंत होले,दशरथ बोरावके,एकनाथ बोरावके जगन्नाथ झुरुंगे, श्यामराव होले, नवनाथ होले, विक्रम होले ,काका होले, यासह ग्रामस्थ मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.