नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आधिकराव चव्हाण यांची माहिती
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पाटण
स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले १२ वर्षे विर जिवाजी महाले जयंती साजरी केली जात आहे, या वर्षी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व सभासद आणि सर्व नाभिक समाज बंधू भिगीनींना कळविण्यात येत आहे की सध्या महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात कोरोना वायरस या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे जिल्हयात रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची दमछाक झाली आहे.
त्यामुळे सर्व सण, उत्सव घरगूती व साध्या पद्दतीने साजरे करण्यासाठी वारंवार सांगण्यात येत आहे यास प्रतिसाद देत आपणही यावर्षी गुरुवार दि. ८ रोजी प्रत्येक वर्षी प्रताप गडावर विर जिवाजी महाले जयंती निमित्त ज्योत आणण्यासाठी जात होतो परंतु या वर्षी कोणीही प्रतापगडावरती ज्योत आणण्यासाठी जाऊं नये व शुक्रवारी दि. ९ रोजी विर जिवाजी महाले जयंती कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाने आपापल्या तालुक्यात काही मोजके पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टेंस ठेवून शूर वीर विर जिवाजी महाल यांच्या प्रतिमेचे पुजन करून साध्या पद्धतीने जयंती साजरी करावी असे आवाहन स्वाभिमानी नाभिक संघटनेचे सातारा जिल्हाअध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी केले आहे.