विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती
लोणंद : लोणंद शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन उद्या दि. २६ सप्टेंबर रोजी, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाई खंडाळा महाबळेश्वर चे जननायक आ.मकरंद पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे लोणंद शहर राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लोणंद राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लोणंदच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत तसेच दलित वित्त च्या माध्यमातून सुमारे एक कोटी तेहतीस लाख रूपयांची विकासकामांचे भूमिपूजन विविध प्रभागातून करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून डॉ. नितीन सावंत सदस्य, सातारा जिल्हा कोविड समन्वय समिती यांनी दिली. तसेच आगामी काळात वैशिष्टय़पूर्ण योजनेंतर्गत विषेश बाब म्हणून आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून लोणंदसाठी लवकरच आणखी दोन कोटी चाळीस लाख निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगीतले.
सदर भूमिपूजनाची सुरुवात ऊद्या सायंकाळी चार वाजता लोणंद येथील अहिल्यादेवी स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध प्रभागातील भूमिपूजन समारंभ झाल्यानंतर, सायंकाळी साडेपाच वाजता लोणंद राष्ट्रवादीच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा पदग्रहण समारंभ अमृता मंगल कार्यालयात लोणंद येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद खरात, लोणंद नगरपंचायतीचे माजी नगरसेवक गटनेता हणमंतराव शेळके पाटील, माजी सभापती पंचायत समिती खंडाळा विनोददादा क्षीरसागर उपस्थितीत होते. माजी नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.