महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी :
येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे कराड शहराध्यक्ष विनायक भोसले यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतीच त्यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थी सेना सरचिटणीस गजानन काळे तसेच मनसे सचिव आशिष साबहे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवत त्यांच्या विचाराने प्रेरित होत विनायक भोसले यांनी कराड शहर व परिसरात मनसेचे कार्य जोमाने पार पाडत आहेत. तसेच शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यात आंदोलनातून नागरिक, विद्यार्थी यांच्या विविध प्रश्नावर आक्रमकपणे आपली भूमिका मांडून प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा
नेहमीच प्रयत्न असतो. कोरोना काळात सुध्दा मनसेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांनी विविध प्रकारची मदत मिळवून दिली आहे. नुकत्याच झालेल्या महासंपर्क दौऱ्यात विद्यार्थी सेनेच्या शाखांचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक भोसले यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या सर्व कार्याची दखल घेत तळागळातील नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी झटणाऱ्या मनसे कार्यकर्त्यास अमित ठाकरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी संधी दिल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल त्यांचे मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, कराड शहराध्यक्ष सागर बर्गे, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, नितीन महाडिक, तालुकाध्यक्ष दादा शिंगण, सतिश यादव व असंख्य कार्यकत्यांनी अभिनंदन केले.