महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश संयोजक पदी लासुर्णे येथील गजानन वाकसे यांची निवड करण्यात आली आहे .
वाकसे यांनी भाजपच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाची तसेच पक्षाचे गणप्रमुख म्हणून पदावर असतानाच्या काळात केलेल्या कामाची दखल घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आमदार राहुल कुल, धर्मेंद्र खांडरे , नरेंद्र पवार, अशोक चोरमले या सर्वांचा मी आभारी असून, यांच्या सहकार्याने या महत्त्वाच्या पदावर आपणास काम करण्याची संधी मिळालेली आहे.
आगामी काळात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर राहील असे गजानन वाकसे यांनी सांगितले . भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश संयोजकपदी व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर गजानन वाकसे यांचा पहिल्यांदा सत्कार हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते संपन्न झाला .