महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
राज्य सरकारच्या इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील जिल्ह्या करीता २०% बीज भांडवल योजनेचे ६० व थेट कर्ज योजनेचे १०० भौतिक उद्दिष्टव प्राप्त झाले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाने दिली आहे .
२०% बीज भांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबविली जाते . यासाठी प्रकल्प मर्यादा ५ लाख आहे. यात महामंडळाचा हिस्सा २०% व बँकेचा हिस्सा ७५% असून लाभार्थीचा सहभाग ५% आहे . कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षे आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष व संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे . थेट कर्ज योजना महामंडळामार्फत राबिवली जाते , त्याची मर्यादा एक लाख आहे . या योजनेत नियमित कर्ज फेड करणान्यांना व्याज आकारले जात नाही थकीत राहिल्यास ४% व्याज आकारले जाते .
अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष आणि सिबील क्रेडीट स्कोर किमान ५०० इतका असावा. संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख पर्यंत असावे शासनाच्या कौशल्य विकासामार्फत तसेच शासकीय / निमशासकीय संस्था मधून तांत्रिक प्रशिक्षण घेतले त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे . अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळ जिल्हा कार्यालयात संपर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , इमारत क्र बी, स नं.१०४ /१०५ , मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा , पुणे-४११००६ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .