- सातारा : कोरोनाचे संकट येण्यापूर्वी आपण खूप चुकलो होतो. कधीच आपण श्वास घेणे, स्वतःला फिट ठेवणे, फुफ्फुसाची कार्यप्रणाली व्यवस्थित ठेवणे, या सर्व गोष्टींना महत्व दिले नव्हते. म्हणून आज एवढी प्रचंड महामारी आपण पाहतो आहे. पण आता भविष्यामध्ये रक्ता आभावी लोक मृत्युमुखी पडले असे होऊ नये आणि आपल्याच लोकांकरता आपण उपयोगाला पडलो नाही ही भावना जशी आज आपल्याला सळो-की-पळो करत आहे तशी भविष्यात अशी भावना रक्ता अभावी येऊ नये म्हणून आजच सुज्ञ होऊन आपण रक्तदान केले पाहिजे. आजची परिस्थिती आपण पाहतोय पश्चातापाला जागा नाही आणि पश्चाताप करून फायदा ही नाही. अशी पश्चातापाची वेळ भविष्यात रक्ताच्या अभावाने येऊ नये. म्हणून सर्व ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. निश्चितच ही आगामी संकटाची चाहूल असावी. आणि आगामी कोणतेही संकट पचवण्याची क्षमता आपल्याकडे असावी हेही तितकेच महत्त्वाचे. भविष्यातील रक्ताचा तुटवडा आणि त्यामुळे येणारे संकट लक्षात घेऊनच आम्ही म्हणजे शिवछत्रपती चारीटेबल ट्रस्ट जिजाऊ प्रतिष्ठान प्रकृती हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने
- लायन्स क्लब सातारा कॅम्प
- सातारा डिस्ट्रिक्ट जिम असोसिएशन
- लायन्स क्लब सातारा MIDC
- सातारा जिल्हा मंडप, लाईट फ्लॉवर डेकोरेशन असोसिएशन
- नगरसेवक सुनील काळेकर मित्र समूह
- कट्टा ग्रुप शाहूपुरी
- जय श्रीराम प्रतिष्ठान सातारा
- सजग पालक सामाजिक संस्था सातारा
- शाहूपुरी प्राईड रन
- शाहूपुरी गणेशोत्सव मंडळ
- सरकार ग्रुप
- मयूर बल्लाळ मित्र समूह
यांच्या सहकार्याने दिनांक 16 मे 2021 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनंत इंग्लिश स्कूल सातारा या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपण जाणते आणि सुज्ञ बनून आजच रक्तदान करून रक्तदाता हे सर्टिफिकेट मिळवणे गरजेचे आहे. भविष्यात नक्कीच रक्तदाता झाल्याचे आपणास समाधान असेल.
सगळीकडे कोरोना ची लस घेण्यासाठी पळापळ चाललेली आहे. परंतु अतिशय क्रिटिकल कंडिशन मध्ये असलेले लोक, पेशंट यांना ज्यावेळी रक्ताची गरज भासते त्यावेळेला कोरोना ची लस घेतलेले किंवा कोरोना होऊन गेलेले अशा लोकांचे रक्त देता येत नाही. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता रक्ताचा तुटवडा जाणवत आहे आणि पुढेही जाणवेल. म्हणूनच लोकाभिमुख हा उपक्रम सर्वांकरता घेतला आहे. या कोरोणाच्या महामारीत आपण पाहतोय वैद्यकीयदृष्ट्या लोकांना प्रचंड मदतीची गरज आहे. ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत असताना भविष्यात आणि चालू स्थितीत रक्ताचा तुटवड्यावर मात करण्यासाठी ज्यांनी लस घेतलेली नाही, ज्यांना कोरोन झालेला नाही अशांनी या शिबिरात सहभागी होऊन एखाद्या निष्पाप लहान बालकापासून वयोवृद्ध व्यक्तीला वाचवण्याचे पुण्य कमावले पाहिजे. रक्तदान म्हणजेच जीवनदान हे सत्य आहे. एखाद्या जीवाला वाचवण्याचे पुण्य निश्चितच प्रत्येकाने केले पाहिजे. या ठिकाणी ब्लड ग्रुप तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी करून मगच रक्तदान स्वीकारले जाणार आहे. आपण कोरोना काळात केलेल्या सर्वश्रेष्ठ दानाचा विशेष सन्मान त्याठिकाणी केला जाणार आहे. आयुष्यात कधीही रक्तदान केले नसले तरी आता करा, अन्यथा भविष्यात आपल्याला रक्त मागायचा अधिकार राहील याची खात्री नाही. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने तरी किमान रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. रक्तदान करून माणुसकीचा सन्मान वाढवूया.मी रक्तदान करून स्वतःची सामाजिक बांधिलकी जपणार आहे. आपणही यात सहभागी व्हा. चला माणुसकी जपू आयुष्यात एकदा तरी रक्तदान करू. असे आवाहन संयोजकांच्या व आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.