महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण आदी सुधारणांचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू चौक कराड येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड शहर अध्यक्ष नंदकुमार बटाने, गंगाधर जाधव, नगरसेवक किरण पाटील, मोहनराव पाटील, बापू करपे, आप्पा कळके आदी उपस्थित होते.