महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मसूर :
भात पीकाला या हंगामात वातावण पुरक असल्यांने भाताचे पीक जोमात आले असताना गेल्या चार दिवसांपासून आलेल्या महू रोगाच्या प्रादुर्भावामुळे कोपर्डे हवेली येथील शेतकरी चिंताग्रस्त असून या रोगावर उपाय योजना करण्यात याव्या अशी मागणी कृषी विभागाकडे शेतकरी करत आहेत. कृष्णाकाठी बागायती क्षेत्रातावर ऊस पीकाबरोबर भाताचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात.येथील तांदळाला चांगली मागणी असल्याने उत्पादन खर्च शेतकरी चांगला करून जास्त उत्पादन काढतात.सध्याच्या हंगामात भात पीकाला चांगले वातावर असल्यांने भाताचे पीक चांगले आले आहे.सध्या भाताच्या पीकाला पोटरे पडले आहेत.
गेल्या चार दिवसांपासून काही शेतकऱ्यांच्या भात पीकावर महू रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांना चिंता लागून राहीली आहे. महू रोगामुळे भाताचे पीक पुर्णपणे वाळत आहे.भाताच्या शेतात ठिकठिकाणी भाताचे पीक वाळत आहे.याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.काही शेतकऱ्यांनी औषधांच्या फवारण्या केल्या तरी त्याचा उपयोग होत नाही.महू रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या नजिकच्या क्षेत्रावर परीणाम होवू नये म्हणून काही शेतकऱ्यांनी भाताचे पीक कापले आहे.वाळलेल्या भातावर वेगळेच किडे दिसत आहेत.सुमारे चार टक्के भात क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.

सध्या भाताचे पीक चांगले आले आसताना अचान आलेल्या महू रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून गावातील काही शेतकऱ्यांच्या भात पीकावर महू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक जळत आहे.सध्या भाताचे पीक पीक चांगले आले आहे.पण हे पीक वाचवण्यासाठी कृषी विभाने लक्ष घालणे महत्त्वाचे आहे. संभाजी चव्हाण.. संचालक कृषी संगम शेतकरी संस्था कोपर्डे हवेली.






















