महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी पाटण :
पाटण तालुक्यातील कोयना जलाशयालगत वसलेल्या अवसरी गावात दुर्मिळ जातीचे घुबड सापडले असून स्थानिक ग्रामस्थांत या बाबत कुतुहल निर्माण झाले आहे, याबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोयना धरणाच्या शिवसागर जलाशया च्या काठावर वसलेल्या आवसरी या गावालगतच्या शेतात दुर्मिळ जातीचा पक्षी मुलांना आढळला
घुबाड सदृष्य दिसणारा हा पक्षी पांढ-या शुभ्र रंगाचा असून या पक्षाच्या अंगावर राखाडी व काळ्या रंगाचे टिपके आहेत, याची माहिती मिळताच या दुर्मिळ जातीच्या पक्षास पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली, या घुबाड सदृष्य दिसणारा पक्षी या परिसरात आढळल्याने ग्रामस्थांत या विषयी कुतूहल निर्माण झाले आहे, दरम्यान हा पक्षी दुर्मिळ जातीचे घुबड असल्याचे वन्यजीव प्रेमींकडून सांगण्यात आले