महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार व प्रदेश सरचिटणीस संतोष आव्हाड यांचा दि.११/१०/२०२० रोजी पश्चिम महाराष्ट्रात दौरा असताना भिगवन येथे इंदापूर मंडल व बारामती मंडलाच्या वतिने स्वागत करण्यात आले.
कार्यकारनी जाहीर होताच सर्वात आगोदर पुर्ण ताकदीने भटके विमुक्त आघाडी ने इंदापूर तालुक्यात वृक्षारोपण करून कामास सुरवात केली . याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे , पश्र्चिम महाराष्ट्र संयोजक अशोक वणवे , युवा मोर्चा प्रदेश सचिव अभिजित देवकाते , पुणे जिल्हा भटके विमुक्त अध्यक्ष शिवाजी तरंगे , शिवाजी देवकाते , माउली मारकड , हनुमंत निंबाळकर , गणेश सूळ , राजेंद्र जमदाडे , मुबारक सय्यद , आमोल गलांडे , पांडूरंग सूळ , महादेव डोंबाळे , राम जाधव , पोपट कचरे , शिवाजी गायकवाड व अन्य भटके समाजाचे प्रतिनिधी हाॅटेल स्वामिराज येथे आयोजित मिटींग मध्ये हजर होते . त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात भटके विमुक्तचे मोठे काम उभा करण्याचा संकल्प इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या घरा समोर एक झाड लावून करण्यात आला .