महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १००१ बेलाच्या रोपांचे वाटप नीरा – भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी महाविद्यालयात केले .
बेलाच्या वृक्षात आरोग्य वर्धक अनेक गुण दडलेले आहेत. बेल पोटदुखी ते मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे . पचनशक्ती व स्मरणशक्ती वाढीवणारे बेलवृक्षाचे हर्षवर्धन पाटील यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण प्रत्येकाने करावे , या हेतूने राजवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांना बेलाच्या रोपांचे वाटप करण्यात आले .यावेळी प्राचार्य संजय चाकणे , डाॅ. शिवाजी वीर , डाॅ. भिमाजी भोर , डाॅ. सदाशिव उंबरदंड , डाॅ. भरत भुजबळ , नागनाथ ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते .