महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा:
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना पुढे आली, परुंतु ग्रामिण भागातील विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षण घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणा पासून विद्यार्थीं वंचित राहू नयेत म्हणून खंडाळा तालुक्यातील आहिरे गावातील ऋषिकेश धायगुडे यांचा वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुखेड निंबोणी मळा येथे अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कै. अविनाश भाऊ यांचे समाजकार्य आपण असंच पुढे चालू ठेवावे सुखेड ग्रामस्थ सदैव आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू असे युवा नेते ओंकार रासकर म्हणाले, यावेळी संदीप धायगुडे गुरुजी, यांनी मनोगत व्यक्त करताना समाजसेवेचा वारसा असाचा पुढे कायम सदैव चालू ठेवावा असे संदीप धायगुडे गुरुजी म्हणाले करून ऋषिआप्पा धायगुडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभेच्या देण्यासाठी महाराट्र राज्य मजूर फेडरेशनचे माजी संचालक सुरेश राव धायगुडे, माझी विकास सेवा सोसायटी चेरमन बाळासो धायगुडे, उपसरपंच आर्चना धायगुडे, सदस्य रवींद्र धायगुडे , , महेश धायगुडे, ओंकार रासकर ,अक्षय धायगुडे, आप्पा धायगुडे हे मान्यवर उपस्थित होते.आभार युवा नेते अक्षय धायगुडे यांनी मानले