महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा
महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील , तरूणींवरील , बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे,अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात आली या अनुषंगाने सातारा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी महिला सुरक्षिततेबाबत त्वरित sOP बनविण्याविषयी मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हणले आहे की,महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे.त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातहीकोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे.भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरभी भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा ताई पाटील, महिला मोर्चा सातारा शहराध्यक्ष रीना बनगे, महिला मोर्चा सातारा ग्रामीणचे अध्यक्ष मोनाली पवार, सातारा नगरपालिका गटनेत्या व नगरसेविका सिद्धीताई पवार, नगरसेविका आशाताई पंडित, जिल्हा कार्यकारणी सदस्य सौ सुनिशा शहा, सातारा शहर उपाध्यक्ष सौ मनीषाताई पांडे, भाजपाचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष वैष्णवी कदम ,सातारा शहर चिटणीस सौ नजमा बागवान, युवती मोर्चा तालुका अध्यक्ष पल्लवी गायकवाड, सारिका मदने, कोमल अनपट, पुनम बाबर, शमीन शेख, पूनम पवार, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बालशेटवार ,सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष ॲडवोकेट प्रशांत खामकर, राहुल शिवनामे ,सतीश भोसले ,जिल्हा चिटणीस सुनील जाधव, सभापती मिलिंद काकडे ,नगरसेवक धनंजय जांभळे, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




















