महाराष्ट्र न्यूज मायणी प्रतिनिधी : मंगेश भिसे
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात अतिशय वेगाने वाढत चालला असून याचे गांभीर्य ओळखून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिकांसाठी दिवसरात्र एक करून जनतेची सेवा करणारे पत्रकार व आशा सेविका यांना राज बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे व उपाध्यक्ष सतिश डोंगरे यांच्या वतीने सॅनिटायझर व पिण्याच्या पाण्याची बाटल्यांचे वाटप करण्यात आला.
राज बहुउद्देशीय संस्थेने कोरोना महामारीच्या संपूर्ण लॉकडाऊन मध्ये गोर गरीब कुटुबांना धान्य वाटप,पत्रकार दत्ता कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मायणी पक्षी आश्रय स्थान येथे सुशोभीकरण ,वृक्षांरोपण,माहिती फलकाचे काम या संस्थेमार्फत केले आहे .अश्या प्रसारमाध्यमातून लोकांपर्यंत हरएक घटनेची माहिती देण्याचे काम पत्रकार करतात यासोबतच लोकांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम आज आशसेविका जीवावर उदार होऊन करीत आहेत , त्यांच्या सुरक्षिततेसाठी संस्थेने हा उपक्रम राबविला आहे. यापुढेहीे मायणी व परिसरातील सामाजिक प्रश्नांची सोडवणूक संस्थेच्या माध्यमातून करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे यांनी यानिमित्ताने सांगितले .
यशवंत बाबा मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे वेळी पत्रकार महेश तांबवेकर, तानाजी चव्हाण, सतीश डोंगरे, विशाल चव्हाण,स्वप्नील कांबळे, अँडव्होकेट एकनाथ जाधव यांचेसह आशा सेविका उपस्थित होत्या.
































