महाराष्ट्र न्यूज बिदाल प्रतिनिधी : आकाश दडस
माण तालुक्यात बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने तिनं दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दुष्काळी माणच्या मातीतील बळी राजाच्या हाता तोंडाची आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर रब्बी हंगामातील पेरणी या पावसामुळे लांबणीवर पडल्याने दुहेरी संकटात माणचा बळीराजा सापडला आहे
माण तालुक्यात नगदी पैस्याचे पिक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते त्यामुळे माण मध्ये बहुतांश ठिकाणी कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात होती व झाली ही होती त्यामुळे . आता कुठे कांद्याचे दर वाढून शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळणार असे वाटत असताना सततच्या पावसामुळे शेतातील पावसाचे पाणीच निघाले नसल्याने कांदा नासून जाण्याची भिती शेतकऱ्यांना लागली आहे . त्यामुळे कांदा लागवडीचा केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात भर म्हणून कांदा बियाणांच्या दरातही विक्रमी वाढ झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
बाजरी ,मका ,मुग मटकी घेवड्यासह भाजी पाल्याचे डांळीब, चिक्कू, द्राक्ष ,पेरु आदी फळांच्या झाडांचे मोहर ,फळे पडल्याने मोठ्या प्रमाणात सलग दोन वर्षी नुकसान होत आहे शासनाने गत वर्षी नुकसान भरपाईचे कागदीघोडे नाचवले मदत हि आली पण हि मदत फक्त बागायत शेतकऱ्यांनाच दोन ते पाच एकरात पर्यातच्या शेतकऱ्यांना मदतीवाचून प्रशासनाच्या किचकट अटींमुळे वंचीत रहावे लागले होते यावर्षी तर या नुकसानीची मदत सामान्य शेतकऱ्यां पर्यात पोहचणार का असा प्रश्न बळीराजा विचारत आहे
माण मधील कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर येणार का ?
माण तालुक्यातील कृषी अधिकारी शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी व नुकसान पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार का कार्यालयात बसून नुसता सरकारचा पगार घेणार असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी विचारत आहे . माण बाजार समिती व कृषी विभागावर शेतकऱ्यांचे प्रचंड नाराजी असल्याचं चित्र सध्या दिसत आहे