महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बिदाल :
माण तालुक्यामध्ये आज उमेद संस्थेच्या वतीने शासनाच्या खाजगी करण्याच्या निर्णयाचा जाहीर निषेध करत सरकारला निवेदनद्वारे मागण्याचे विविध करण्यात आल्या आहेत.या वेळी दहिवडी येथे तहसीलदारांना व पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
यावेळी निवेदनात विविध मागण्या ज्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती थांबले आहे त्यांना तात्काळ पुनर्नियुक्ती मिळावे .कोणत्याही बाह्यसंस्थेला कर्मचारी नियुक्तीचे अधिकार देऊ नये. ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना पदावरून तात्काळ हटवण्यात यावे. उमेद अभियानअंतर्गत महिलांना स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ, प्रभातसंघांना दिल्या जाणाराखेळता भांडवल निधी समुदाय गुंतवणूक निधी, जोखीम प्रणवता निधी ,यात दुप्पट वाढ करण्यात यावी व निधी वेळेत देण्यात यावा. सर्व ग्रामस्तरावरील प्रशिक्षित पशुसखी, उद्योगसखी,वनसकी, मत्स्यसकी, कृषीसखी, बँकसखी या सर्व प्रेरिका यांचे मासिक मानधन वाढवून दहा हजार रुपये करण्यात यावे. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
यावेळी असे निवेदनात म्हणण्यात आले शासनाने निर्णय घेतल्यास आम्ही सदर आंदोलन अधिक तीव्र करून पुढील मोर्चा लवकरच मुंबईमध्ये काढून यामध्ये राज्यातील सर्व महिला सहभागी असतील असे यावेळी सांगण्यात आले.