लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा 47 वा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम संपन्न.
दौलतनगर दि.18:- कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत असून अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. परंतु कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद,शेतीकरी यांच्या सहकार्याने आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 चा गळीत हंगाम यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करत या गळीत हंगामात तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी कोणत्याही क्षणिक मोहाला बळी न पडता आपला पिकवलेला सर्व ऊस लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याला घालून सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी केले.
दौलतनगर,ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 47 व्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी बोलत आहे.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष जयवंतराव शेलार, संचालक शशिकांत निकम, सोमनाथ खामकर, गजानन जाधव, आनंदराव चव्हाण, राजेंद्र गुरव,बबनराव भिसे, पांडूरंग नलवडे, संचालिका सौ. विश्रांती विजय जंबुरे,सौ. दिपाली पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, सुरेश पानस्कर,संतोष गिरी,ॲङ डी.पी.जाधव, बशीर खोंदू, भरत साळूंखे,रघुनाथ माटेकर,गणेश भिसे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक विकास बाळकू गिरी-गोसावी व त्यांच्या पत्नी सौ. स्वाती विकास गिरी गोसावी यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयोजित केली होती.
यावेळी बोलताना नामदार शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, अतिशय प्रतिकुल परस्थितीमध्ये राज्यातीला सहकारी साखर उद्योग चालला आहे. जी काही शासकीय बंधने आहेत ती सहकारी साखर उद्योगाला आहेत. दोन तीन वर्षामध्ये चारही बाजूंनी साखर कारखाने अडचणीत येण्याची परस्थिती निर्माण झाली आहे. सहकारी तत्वावर असलेल्या साखर कारखान्यावरती शासनाचे नियंत्रण असल्याने हे सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच कारखाने चालवावे लागतात. गेल्या वेळच्या हंगामाच्या अखेरीस कारखान्यापुढे कोरोनाचे संकट उभे राहिले. अशा संकटात शेतकऱ्यांना कारखान्याने दिलास देत संपूर्ण ऊसतोड पुर्ण करत मागील गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडला. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही. ही वस्तूस्थिती असताना देखील परंतु काही मंडळी जाणिव पूर्वक कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना कसा जाईल यासाठी प्रयत्न करताना दिसत असून कार्यक्षेत्रातून ऊस बाहेर जाऊ नये याकरीता कारखाना व्यवस्थापनाने आवश्यक ते धोरण राबविले पाहिजे. अनेक अडचणी असतानाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळयासमोर ठेवत गत गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसाला शासन नियामाप्रमाणे संपूर्ण एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांना दिली असून कारखाना संचालक मंडळाने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,सन 2020-21 चा गळीत हंगाम लवकर सुरु करण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी व कामगारांनी काळजी घेत ऑफ सिजनची कामे पुर्णत्वाकडे नेली आहेत. येत्या काही दिवसात कारखाना गळीतासाठी सज्ज असल्याने तालुक्यातील शेतक-यांनी व सभासदांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता पिकवलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता देवून गळीत हंगाम य़शस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहनी त्यांनी शेवटी केले. चेअरमन अशोकराव पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.