महाराष्ट्र न्यूज सुरवडी प्रतिनिधी : गणेश पवार
दि.१६/१०/२०२० रोजी धनगर समाजाच्या वतीने सुरुवडी येथे महाड पंढरपूर महामार्ग रोखून धनगर समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या वेळी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात, धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करून आरक्षण मिळावे व महाराष्ट्र भर मेंढपाळ यांच्यावर होत असलेले हल्ले रोखुन त्यांना संरक्षण मिळावे अशी मागणी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.
धनगर समाजाला मागील ७३ वर्षापासून सर्वच राजकीय पक्षांनी ह्या प्रश्नाबाबत झुलवत ठेवले आहे. व संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद असताना सुद्धा ह्या प्रश्नाचे घोंगडे भिजत ठेवले असून केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी धनगर समाजाचे हेच एस टी प्रवर्गात आरक्षणाचे अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणी केली आहे. यावेळी विकास तांबे, अनिल तांबे हरीश कोळपे व रंजीत तांबे व धनगर बांधव उपस्थित होते.