किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२२ या होत आसलेल्या निवडणूकी साठी आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे व शशिकांत दादा पिसाळ जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती यांच्या नेतृत्वाखाली किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पॅनल निवडणूक लढवत असून यांना भारतीय मराठा महासंघ यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याचे जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की खंडाळा वाई कोरेगाव सातारा महाबळेश्वर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सभासद वर्ग आहे. काही वर्षेपासून सभासद शेतकरी वर्गाची परिस्थिती अत्यंत वाईट असून शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. कारखान्याला ऊस देऊन आज तीन ते चार वर्षी झाले शेतकरी व सर्वसामान्य लोकांचे पैसे वेळेवर मिळत नसतील व किसनवीर कारखाना बंद आसल्यामुळे कामगार वर्ग रस्त्यावर आला आहे. बाहेरील साखर कारखान्यात उस जात नाही रात्रीचा दिवस करून लावलेल्या पिकाचा योग्य मोबदला मिळत नसून शेतकऱ्यांची अवस्था अशी का? कुणामुळे झाली याला कारणीभूत कोण? किसनवीर कारखान्यावर ज्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला व किसनवीर कारखान्यात चूकीच्या पध्दतीने कारभार झाला या मुळे कारखान्याच्या सभासदवर्ग व कामगार यांना मरण यात्ना सहन कराव्या लागत आहेत. आमदार मकरंद आबा व नितीन काका पाटिल यांनी प्रत्येक वेळेस सर्वसामान्य जणतेसाठी योग्य भूमिका घेऊन सर्वसामान्य जणता व शेतकरी सुखी झाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले आहेत. व त्यासाठीच आता किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पँनला उभा केला असून त्याला सभासदांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्ह्यातून योग्य भूमिका घेत किसनवीर कारखाना वाचला पाहीजे यासाठी व हूकूमशाही मोडीत काढून सर्वसामान्य शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी कारखाना चालू झाला पाहिजे या भूमिकेतून भारतीय मराठा महासंघ वाई कोरेगाव सातारा जावली महाबळेश्वर या तालुक्यात भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघ यांच्या आदेशावरून किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पँनलच्या प्रचारासाठी मराठा महासंघाचे कार्यकर्ते व सभासद काम करत आहेत. तसेच सर्वच्या सर्व किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पँनलचे उमेदवार जास्तीतजास्त मतानी निवडून येतील असा ठाम विश्वास सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघ यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केला आहे.