वाई शहरात बेकायदेशीर देशी दारुची चोरटी वाहतूक करणारी मारुती कार व देशी दारुचे ८ बॉक्स असा एकूण ८३०४०/- रुपयांचा माल जप्त केला आहे. गुन्हे प्रकटीकरण विभाग वाई पोलीस स्टेशनची कारवाई दिनांक १६/०३/२०२२ रोजी पो.नि. भरणे सो यांना त्यांचा खास बातमीदरामार्फत बातमी मिळाली की, वाई शहरात चावडी चौक ते वाई नगरपालीका जाणारे रोडने नीळे रंगाची मारुती कार नं.एमएच/०४/ एवाय/४९१० मधून एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारुची वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहा.पो.फौजदार विजय शिर्के, म. पो. ना.सोनाली माने, पो.कॉ. किरण निंबाळकर,श्रावण राठोड,प्रसाद दुदुस्कर यांना सदर वाहनाचा शोध घेवूनकारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानूसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी सदर वाहनाचा वाईशहरात शोध घेत असताना विष्णू मंदिराचे समोरच सदरची गाडी दिसल्याने १२.३५ वाजण्याच्यासुमारास गाडी थांबवून चालकास बाहेर बोलावले व त्यास नांव पत्ता विचारुन त्याच्या ताब्यातमिळालेल्या मारुती कार नं.एमएच/०४/एवाय/४९१० ची झडती घेतली असता त्याचे पाठिमागिल शीटवर४ देशी दारुचे बॉक्स व डीग्गीमध्ये ४ देशी दारुचे बॉक्स मिळून आले आहेत.सदर आरोपी कडून किं.रु.६००००/- ची मारुती कार नं एम एच ०४ एवाय ४९१० व किं.रु.२३०४०/- रु. किंमतीच्या देशी दारुच्याबाटल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहे.आरोपी विरुध्द वाई पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यातआलेला असून गुन्हयाचा तपास म.पो.ना.सोनाली माने या करीत आहेत.सदरची कारवाई अजयकुमार बन्सल,पोलीस अधीक्षक सातारा, अजित बो-हाडे,अपरपोलीस अधीक्षक सातारा,श्रीमती शितल जानवे/खराडे उप विभागीय पोलीस अधिकारी वाई, यांचेमार्गदर्शनाखाली बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीसउपनिरीक्षक विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो.कॉ.किरण निंबाळकर, श्रावणराठोड, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांनी सहभाग घेतला होता.





















