महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कराड
माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रमांसह शहरातील स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी तृतीयपंथीयांनी रॅली काढली येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच मुकादम उपस्थित होते.
शहरातील बहुतांशी तृतीयपंथीयांनी जनजागृतीच्या रॅलीत सहभाग घेतला होता. कराड येथील कोल्हापूर नाका येथून रॅलीस प्रारंभ झाला यावेळी मुख्याधिकारी डाके यांच्यासह पालिकेचे मुकादम मारुती काटरे, संजय भोसले, राजू सपकाळ, प्रमोद कांबळे, अभिजीत खवळे, शेखर लाड, संजय चवरे, संजय लादे, अशोक डाईंगडे, देवेंद्र जाधव उपस्थित होते. पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली पोपटभाई पेट्रोल पंपा पासून थेट दत्त चौकात आली तेथून मुख्य रस्त्याने आझाद,ते चावडी चौकातून कृष्णा घाटावर व तिथून पुढे कन्याशाळा, कृष्णा नाका, उपजिल्हा रुग्णालयामार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे गेली.
जालना विजय दिवस चौक वारांगना वसाहत बुधवार पेठ येथून रॅली भाजी मांड मंडळीही गेली रॅली तृतीयपंथीयांनी कोरोना जनजागृती सह स्वच्छतेचे ही जनजागृती केली मास्क सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत ती त्यांनी जागृती केली रॅलीला येथील न्यायालयाच्या परिसरात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी भेट दिली. रॅली पालिकेत आल्यावर उपाध्यक्ष जयवंत पाटील, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, जयंत बेडेकर, मोहसीन आंबेकरी यांनी रॅलीचे स्वागत केले व त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीची समाप्ती झाली.



















