महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :ढेबेवाडी
काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी बचावली पाटण तालुका काँग्रेस समितीने ऑनलाईन सहभाग नोंदवत केंद्र शासनाच्या कृषी विषयक धोरणाचा निषेध केला. केंद्र शासनाच्या कृषी विधेयकावर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसने राज्यभर शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन केले आहे.
पाटण तालुका काँग्रेस समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ढेबेवाडीतुन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यामध्ये सहभागी झाले होते.काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी रजनीताई पवार, युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस अभिजीत पाटील, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष वंदनाताई आचरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटणकर, सदाशिव कदम तंटामुक्तीचे अध्यक्ष दादासाहेब साळुंखे, अरविंद कुंभार, सुहासचंद्र पाटील, कुमार कांबळे, विकास पाटील, संजय काळुगडे, सचिन देसाई आदी उपस्थित होते. हिंदुराव पाटील म्हणाले “काँग्रेस पक्षाने तयार केलेले कृषी विषयक कायदे सध्याच्या केंद्रातील सरकारने मोडीत काढून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे काँग्रेस पक्ष हा डाव हाणून पाडेल, त्यासाठी शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे”.






















