कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात 22 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणामही राज्यात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना आकडेवारीत घट दिसून येत आहे. मात्र तरीही रोज जवळपास 40-50 हजार कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळेच लॉकडाऊन आता 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 15 मे नंतर आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
मोठा दिलासा! राज्यात सोमवारी 61,607 रुग्ण बरे होऊन घरी, तर नवीन 37,326 रुग्णांचे निदान
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झालेला मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. आज राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 37,326 रुग्णांचे निदान झाले आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा 40 हजारांच्या खाली आला आहे.