महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : लोणीभापकर
पळशी येथे दि.१९ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समितीच्या सभापती निताताई बारवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले. यावेळी नीरा मार्केट कमिटीचे सभापती मुरलीधर ठोंबरे, पंचायत समितीचे सदस्य राहुलभैय्या भापकर, नीरा मार्केटचे माजी सभापती संजय गाडेकर, छोटे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बुवासाहेब, शाखा अभियंता अशोक कोकरे, आंबीचे सरपंच प्रवीण शिर्के, चोपडजचे सरपंच समीर गाडेकर, राजेंद्र गाडेकर, पळशीचे सरपंच बाबासाहेब चोरमले तसेच उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.






























