महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी म्हसवड : म्हसवडच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कायम कोरडी असलेला शिक्का असलेली माण तालुक्याती एकमेव नदी म्हणजे माणगंगा हि मंगळवारी रात्री भरभरुन वाहीली नव्हे पुर परिस्थीती निर्माण होऊन विश्रामगृहा नजीक असलेल्या नदीपात्राच्या पलीकडील बाजुस चार शेतकरी कुंटूंबाच्या घराला नदीला आलेल्या पुराने वेडा दिला होता घरे थोड़ी उंचावर होती त्यामुळे धोक जरी नसला तरी हि १४ तास पाण्याच्या वेढ्यात रात्र १७ लोकांनी काढली सकाळी ९ वाजता माणच्या तहसीलदार बाई माने यांनी व म्हसवड पालिकेच्या मुख्याधिकारी सचिन माने व सागर सरतापे यांच्या टिमने तत्परता दाखवत नदी पात्रातील पाणी कमी झाल्यावर बंधार्याला दोर बांधून १७ नागरीकांना पालिकेच्या कर्मचार्यानी पाण्याच्या बाहेर खंद्यावर, झोळीकरुन, काढण्यात यश आल्यावर अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला म्हसवडच्या इतिहासात प्रथमच या पूर्वी ही अनेक वेळा माणगंगेला पुर आला होता २०१९ मध्ये हि माणगंगेला पुर आला होता त्यावेळी दोन मुले पाण्यात बुडाली होती व तिघांना पाण्यातुन बाहेर काढून वाचवण्यात आले होते
तर २००९ मध्ये सिध्दनाथ यात्रेला आलेल्या करमणुकीच्या साधना पैकी नदीला पुर आल्याने पाळणेवाला युवक नदीत वाहुन गेला होता यावेळी १९४७ साली आलेल्या मात गंगेच्या पुरा ऐवढे नदीला पाणी आले होते त्यावेळी नदीवर बंधारा नसल्याने पाणी यात्रापटांगणावरुन आंबेडकर नगर, बस स्थानक, जुनी नगरपालिका परिसरात पाणीच पाणी झाले होते त्या प्रमाणेच बुधवारी रात्री नदीला पुर आला मात्र बंधार्यामुळे पाणी मागे सरकले व पाठीमागे फुगवटा झाला व जीकडे पाण्याला वाट मिळेल तिकडे पाणी पळाल्याने गार्डन ,बायपास रोड , कोटातील महादेव परिसर, यात्रा पटांगण , स्मशानभुमीत पाणीच पाणी झाले तर विश्रामगृहा नजीक असलेल्या कोल्हापुर पध्दतीच्या बंधार्या नजिक राहणारे चार शेतकरी कुटुंबाच्या घरानां नदीच्या पाण्याने वेढा बुधवारी रात्री ११च्या दरम्यान घातल्याने रात्रभर भितीच्या छायेत १७ लोकांनी रात्र काढली नदीला मोटरयान प्रमाणावर पाणी असल्याने रात्रीचे काहीच करता रेत नव्हते फक्त चर्या १७ लोकांना धिर देण्याचे काम पालिकेने व महसुल विभागाच्या माणच्या तहसीलदार बाई माने मानना केले व सकाळी कराडची रेस्कुयू टिम व बोट बाबत चर्चा केली
मात्र काल सर्वत्रच जिल्ह्यात भयवाहक परिस्थीती असल्याने हि टिम येवू शकली नाही गुरुवारी सकाळी ११ वाजता पालिका कर्मचारी यांनी बंधार्यावरील पाणी कमी झाल्यावर दोर बांधला व पाण्यात रात्रीपासुन आडकलेल्या जगन्नाथ जाधव यांच्या घरातील सहा लोक, गंगाराम माणीक माने यांचे घरातील २, लोचना माने यांना,व धोडीराम बाळू दहिवडे यांचे घरातील ८ असे १७ लोकांना खंद्यावर पाटकोळीवर झोळी करुन पालिकेची टिम सागर सरतापे स्मिथ सरतापे, शरद वाघमारे, दादा सरतापे, राजेश चव्हाण, गणेश चव्हाण , अरुण सरतापे शिवराज भोसले आदीनी या सर्वाना पाण्या बाहेर काढून माणुकी जपण्याचे काम पालिका कर्मचारी माननी केले त्यांच्या या धाडसाचे मुख्याधिकारी सचिन माने, नगराध्यक्ष विरकर, तहसीलदार बाई माने उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी यांनी कौतुक केले



















