महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कराड :
गेल्या दोन महिन्यात कराड तालुक्यात कोरोना चा कहर झाला होता. त्यामुळे अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. दररोज कोरोना बाधितांच्या आकड्यांमध्ये भर पडत असल्यामुळे प्रशासनाची व कराडकरांची चिंता वाढत होती.मात्र कराड शहरासह तालुक्यात कोरोना चा कहर नियंत्रणात येण्याची आशा आता निर्माण झाली आहे. कोरोना पॉझिटिव रुग्णांचे आकडे गेल्या काही दिवसापासून कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

रविवारी कराड तालुक्यात ३७ बाधितांचा अहवाल आला आहे. त्यानुसार कराड ६, सोमवार पेठ १, शनिवार पेठ ४, मलकापूर १, विद्यानगर ३, कोरेगाव १, आगाशिवनगर १, काले २, सुपने २, तांबवे १, वहागाव १, कासार शिरंबे १, येनके २, शेनोली १, वडोली भिकेश्वर १, कालवडे १, कापिल १, पेरले ३, गोंदी गावठाण १, ओंड १,सनबुर १ असे एकूण ३७ बाधित झाले आहेत.
तर कराड शहरात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांच्या घटत्या संख्येमुळे कराड करांना दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन महिन्यात असणारे चिंतेचे सावट दूर होताना दिसत आहे. असे असले तरी प्रत्येकाने आपली काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाचे नियम पाळणे फार आवश्यक आहे. व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.






















