महाराष्ट्र न्यूज खटाव प्रतिनिधी : संतोष सुतार
खटाव तालुक्यातील पेडगाव गावच्या हद्दीतील बावदरा शिवारा जवळ अवैधरित्या गांजाची लागवड व जोपासना करत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस ठाण्यात निलेश देशमुख यांना मिळाली त्यांनी तात्काळ कारवाईची सूचना करत सदर ठिकाणी काल रात्री साडेदहा वाजता छापा मारला. त्यामध्ये अंदाजे 25 किलो इतका गांजा मिळून आला असून एकूण 2 लाख 75 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत शालन उत्तम पाटोळे व सुभाष उत्तम पाटोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.