महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी म्हसवड
ओढ्याच्या पाण्यात वाहून आकस्मित निधन झालेले शेतकरी सुनिल सोपान बाबर यांच्या कुटुंबियांचे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देवापूर येथे जाऊन सांत्वन केले.देवापूर ओढ्याची पाणी पातळी अतिवृष्टीमुळे अचानक वाढल्याने शेतात जात असताना सुनिल सोपान बाबर यांचे आकस्मित निधन झाले. या दुर्दैवी घटनेबद्दल सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह; माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा बँक संचालक अनिल देसाई यांनी सुनिल बाबर यांच्या राहत्या घरी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी चार लाख रुपयांचा धनादेश मृताच्या पत्नी सिंधू बाबर यांच्याकडे सुपूर्त केला . यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी,तहसीलदार चंद्रशेखर सानप, गटविकास अधिकारी एस.बी.पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगुले, बाळासाहेब सावंत, पृथ्वीराज राजेमाने, मंडल निरीक्षक दळवी, तलाठी परदेशी व सूर्यवंशी, राजेंद्र देशमुख, विष्णुपंत अवघडे,विश्वंभर बाबर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .






















