महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यात राष्ट्रीय चर्मकार महसंघाच्या वतीने मागील तीन- चार दिवसांपूर्वी न्हावी गावातील दलित वस्तीतील फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी यांनी पाहणी केली व त्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देण्याची हमी दिली.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष नवनाथ शेवाळे , तालुकाध्यक्ष दत्तात्रय माने , शिक्षक सेलचे अध्यक्ष भारत कांबळे , कार्याध्यक्ष संजय खरात , युवक अध्यक्ष गणेश माने , अमोल भगत, रमेश खरात, राहुल क्षीरसागर, गणपत भोसले, बंडू शेवाळे, राहुल वेताळ या सर्व पदाधिकारी यांनी न्हावी गावातील दलित वस्तीतील रहिवास्यांच्या व्यथा जाणून घेवून त्यांना शासकीय स्तरावरून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले