फलटण : तडवळे ता. फलटण या गावातली स्मशानभूमी मध्ये अघोरी प्रकार उघडकीस आला आहे.
असून मागील दोन दिवसापूर्वी एका महिलेचा अंत्यविधी तडवळे गावातील स्मशानभूमीत केला होता. आज गावातील ग्रामस्थ त्याठिकाणी सावडणे विधी करिता गेले असता. अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी जादुटोना किंवा विचित्र अघोरी प्रकार करण्यासाठीचे साहित्य ठेवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
संबंधित महिलेच्या नातलग व ग्रामस्थ या घटनेने चक्रावून गेले असून नुकतेच दोन दिवसापूर्वी सुरुर(वाई) याठिकाणी स्मशानभूमीत मांत्रिकाकरवी केल्या जाणाऱ्या अघोरी प्रकार उघडकीस आल्याने पूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. असाच काहीसा प्रकार आता तडवळे गावातही घडला असून गावातील नागरिकांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे.






























