रेठरे गावचे नाव देशाभरात पोहचविणारे जेष्ठ विचारववंत माजी मंत्री स्व.यशवंतराव मोहिते, सहकार महर्षी व कृष्णा उदयोग समुहाचे शिल्पकार सहकार महर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या गावात
वृत्तपत्र , सामाजिक , क्रीडा , राजकीय , कृषी , शैक्षणिक , वैद्यकीय , आर्थिक , गुन्हे विषयक सर्व बातम्यांचे निर्भीड लेखन करून असंख्य लोकांना न्याय देणारा माणूस म्हणजे दिलीपराव धर्म …गेल्या १३ वर्षात दैनिक पुढारी वृत्तपत्राच्या माध्यमातून दिलीपराव यशस्वी पत्रकारिता करीत आहेत …याच १३ वर्षात असंख्य विषयांवर योग्य अचूक लिखान करून तालुक्यातील विविध प्रश्न त्यांनी सोडविले यातच त्यांचे सामाजिक कार्य दिसून येते.आज त्यांचा वाढदिवस त्यानिमिताने एक आढावा घेणारा छोटासा लेख ….
आपली पत्रकारिता सामाजिक जीवनाला सार्थक लाभावी हे अनेकांचे स्वप्न असते, काहीच लोक पूर्ण करतात काही करत नाहीत मात्र एक स्वप्न सत्यात पूर्ण करणारा माणूस म्हणजे रेठरे बुद्रुक मधील धर्मे – पाटील घराण्यातील श्री.दिलीप किसनराव धर्मे हेच कारण … जुळेवाडी येथील दिव्यांग मुलांची शाळा बंद पडलेली होती … ती सुरु व्हावी…दिव्यांग मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे हा हेतू डोळ्या समोर ठेऊन त्यांनी स्व-खर्चांने शाळा सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला आणि शाळा सुरु करून दिव्यांग मुलांना बालाजी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे काम दिलीपराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केले.
१३ वर्षाच्या पत्रकारितेच्या माध्यमातून वृत्त विषयक मर्यादित काम न करता , एल आय सी च्या मार्फत असंख्य मित्र , नोकरदार , कुटुंबाना बचतीचे सल्ले देऊन अडचणीच्या काळात आर्थिक मदत उभी करून देणारा निस्वार्थी माणूस म्हणजे दिलीपराव… !
गावातील किंवा परिसरातील ग्रामपंचायत , सोसायटी तसेच अन्य राजकारण असो ते पत्रकार म्हणून वृत्ताकन करण्यास एक पाऊल पुढे असतात …कारण ते कृष्णा काठच्या बातमीदारी मधील सक्रिय सामाजिक कार्य करणारे पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख निर्माण त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून केली आहे.
महाविद्यालयीन जीवना पासून संगीत व गायनाची आवड असल्याने गायन हा छंद चांगल्या प्रकारे ते जोपासत आहेत. शेती , पत्रकारिता , गायन , रिकाम्या वेळेत समाजकार्य ह्या मधून त्यांना समाधान मिळते.
कोवीड १९ च्या लॉकडाऊन मध्ये त्यांनी अनेक कुटुंबाना मोफत धान्य तसेच आर्थिक मदत सुद्धा केली मात्र कुठेही जाहिरात किंवा सेट्स बाजी केली नाही यातच त्यांची माणुसकी दिसते ; गावातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले … हेच नव्हे तर गावातील सहकारी यांच्या सोबत प्राथमिक आरोग्य केंद्र मधील अनेक वैद्यकीय कर्मचारी यांचे एक पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून समुपदेशन केले यामुळे गावातील अनेक रुग्ण याना मदतीचा हात भेटला.
बदलत्या पत्रकारितेची स्पर्धा करण्यासाठी त्यांनी गेल्या ५ वर्षा पूर्वीं एक लॅपटॉप घेऊन त्यावर मराठी टाइपिंग , ईमेलिंग शिकून घेतले बातमी जलद गतीने कशी प्रसिद्ध झाली पाहिजे हे शक्य करून त्यांनी दाखविले … ” जे अशक्य आहे ते शक्य करण्याचा नेहमीच ते प्रयन्त करतात ” म्हणूनच ते एक सामाजिक कार्यकर्ते या नावे सुद्धा ओळखले जातात.
श्री.दिलीपराव यांच्या सारख्या दिलदार , प्रयन्तवादी, वैचारिक , सामाजिक , व्यक्तीमत्वास महाराष्ट्र न्यूज च्या टिमकडुन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.






















