महाराष्ट्र न्यूज मायणी : मंगेश भिसे
परतीच्या अति पाऊसामुळे मागील सात ते आठ दिवसापूर्वी गोरेगाव ते अंबवडे पूल वाहून गेला होता. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत
मागील सात ते आठ दिवसापासून हा पूल बंद असल्याने व्यापारी , शेतकरी वर्ग तसेच मोटरसायकल स्वार यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे परंतु वेळीच काम पुर्ण न झाल्याने प्रवाशांना अडचणीना सामोरं जावं लागत आहे .
ह्या पूलावरून दररोज अनेक प्रवाशी प्रवास करत असल्याने परिसरातील ग्रामस्थ यांनी त्वरीत पूलाचे काम पुर्ण करण्यासाठी मागणी केली आहे संबंधित पूलाचे काम पुर्ण करावे कारण जर अशीच अवस्था पूलाची पुढे राहिली तर प्रवाशांचे मोठे हाल होतील