सातारा दि. 21 : पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशानुसार इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थकीत अनुदान वाटप करण्यात आले आहे.
गेले सहा महिने या योजनेचा केंद्राचा हिस्सा अप्राप्त होता. तथापि, राज्यशासनाचा हिस्सा प्राप्त असल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेच्या जिल्ह्यातील 8 हजार 470 लाभार्थ्याना त्याचा लाभ मिळावा यासाठी पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी यांना थकीत अनुदान वाटपाचे निर्देश दिले होते. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना दिवाळी सणाच्या अनुषंगाने अनुदान वाटप करण्यात आले असून निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांची दिवाळी गोड झाली आहे.