महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/ दहिवडी :
रामोशी समाज हा क्रातींकारी व लढवैय्या समाज म्हणून ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या समाजाचा मोलाचा वाटा आहे. अतिशय प्रामाणिक आणि जीवाला जीव देणारा समाज. कोणाशी कधीही गद्दारी न करणारा समाज. इंग्रजांना या देशातून हकालपट्टी करण्यासाठी अत्यंत प्रामाणिक लढा या देशाने दिला होता. रामोशी समाजाचे सैन्य हे कधीच शत्रूला फितूर झाले नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे लढवय्ये मावळे हे रामोशी समाजाचे होते. कारण छत्रपती शिवरायांचा या समाजावरती फार मोठा विश्वास होता. म्हणूनच छत्रपती शिवरायांनी याच समाजातील आपल्या विश्वासू मावळ्याला बहिर्जी नाईक यांना आपल्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख बनवले होते. या देशातील इंग्रजांविरुद्द पहिला लढा देणारे व इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या समाजाला देश स्वातंत्र्य झाल्यापासून अजून कोणत्याही सरकार कडून आतापर्यंत न्याय मिळाला नाही.
स्वातंत्र्यात असूनही पारतंत्र असल्यासारखे या समाजाला जगावे लागत आहे. या समाजाला आतापर्यंत कोणत्याही सोयी सुविधा मिळत नसल्याने अजूनही हा समाज मागासलेल्या अवस्थेत जगत आहेत. आतापर्यंत या समाजातील बरेचसे नेते, समाजसेवक, पुढारी या समाजाच्या प्रगतीसाठी अनेकदा चळवळी आंदोलने केली, मोर्चे काढले परंतु कोणत्याही सरकारने आतापर्यंत या समाजासाठी कोणतेही निर्णय घेतले नाहीत किंवा ठोस पाऊल उचलले नाहीत. रामोशी समाजाचे काही नेते सत्ताधाऱ्यांच्या दावणीला गेले काहीजण सत्ताधाऱ्यांच्या विरोधातही गेले तरीही टिकावं लागला नाही. परंतु अजूनही संपूर्ण महाराष्ट्रातील रामोशी समाजाला अजूनही एका लढवैय्या नेत्याकडून अपेक्षा आहे की समाजाला न्याय मिळवून देणार. ते म्हणजे सांगली जिल्यातील रामोशी समाजातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व व रामोशी समाजाचा खरा योद्धा म्हणून ओळखले जाणारे मोहन मदने उर्फ एम एम नाना. हे रामोशी समाजाला न्याय मिळवून देईपर्यंत शांत बसणार नाहीत अशी अपेक्षा समाजाला आहे. पहिल्यापासूनच या समाजाच्या विकासासाठी तण मन लावून तळमळीने स्वखर्चाने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतात.
समाजातील युवकांच्या प्रश्नावरती तळमळीने आवाज उठवितात. रामोशी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याचदा मोर्चा व आंदोलनेही उभारली होती. त्यांनी आता थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन दिले आहे की महाराष्ट्रात पंचवीस ते तीस लाख लोकसंख्या असलेल्या रामोशी समाजाला अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करावा.






















