महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी. :
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाड्या शर्यतींचे जंगी आयोजन केल्याची माहीती यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी दिली.
स्पर्धेची माहीती देताना ते पुढे म्हणाले, राजेंद्रसिह यादव मित्र परिवार व विनोद पवार ग्रुपने आयोजित केलेल्या या शर्यती रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता कार्वे ,ता.कराड, जि.सातारा येथे संपन्न होणार आहेत.
स्पर्धेत यशस्वी बैलगाड्यांना रोख रकम व शिल्ड देण्यात येणार असुन रोख बक्षीसे पुढीलप्रमाणे देण्यात येणार आहेत प्रथम क्रमांक रु.५१०००/-,व्दितीय क्रमांक रु ३१०००/-, तृतीय क्रमांक रु २१०००/- चतुर्थ क्रमांक रु११०००/- पाचवा क्रमांक रु ७०००/- सहावा क्रमांक रु ३०००/-
कार्वे चौकी धानाई रोड कराड ता. कराड जि. सातारा हे शर्यतीचे ठिकाण आहे.स्पर्धेतील सहभागासाठी ९८२२१२१२२२,९७६४२१२२२२९, ७९६६९५५५५,९८५०८४७२७० या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच जास्तीत – जास्त बैलगाडी धारकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे अवाहन राजेंद्रसिह यादव यांनी केले.






















