गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अविरत मदत करत राहणार.: हिंदू एकता आंदोलन
श्री केदार हायस्कूल सुपने येथील विद्यार्थ्यांना हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष श्री तुषार उर्फ गणेश पाटील यांच्यावतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा छोटासा प्रयत्न हिंदू एकता आंदोलन संघटनेमार्फत राबविण्यात येत आहे. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड येथील अधिकारी श्री विष्णू चव्हाण साहेब (मोटार वाहन निरीक्षक), श्री अमोल पवार साहेब(सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक) संस्थेचे चेअरमन श्री राहुल पाटील आबा,मुख्याध्यापक श्री सुहास गुरव गावातील विविध मान्यवर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.