महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कराड
सध्या जगामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे अशा परिस्थितीमध्ये पाटण तालुक्यात कोरोना पेशंटना असुविधांचा सामना करावा लागतोय उदा . १०८ नंबर ॲम्बुलन्स,व्हेंटिलेटर ,ऑक्सिजन आणि जर कराडला पेशंटला घेऊन गेले तर पाटण म्हणून हॉस्पिटल मध्ये घेत नाहीत . एवढी वाईट अवस्था पाटण तालुक्यातील जनतेची झाली आहे म्हणून बळीराजा शेतकरी संघटना भीक मागून सरकारला आर्थिक मदत करणार आहे.हे आंदोलनाची सुरवात दि . १८/०९/२०२० रोजी शुक्रवारी सकाळी १० वाजता विहे येथून बळीराजा शेतकरी संघटना करणार आहे
मल्हारपेठ , नवरस्ता ,पाटण याठिकाणी भीक मागून जी मदत मिळणार आहे ती मदत पाटण तहसीलदार यांच्या मार्फत सरकारला देणार आहेत