महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / सातारा :
कोरोना महामारीमुळे संपुर्ण जग हादरुन गेले आहे. अशा या भयंकर महामारीच्या काळात स्वताच्या जीवाची पर्वा न करता, स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडून जनसेवेचा आदर्श घालून देणार्या खर्या कोरोना योद्यांना सलाम, अशा शब्दात आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोरोना योद्यांचा सन्मान केला.
स्व. शुक्राचार्य भिसे सोशल फौंडेशनच्यावतीने कोरोना महामारीत निडरपणे आणि निष्ठेने कर्तव्य बजावणार्या आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षकांचा आणि कोरोना बाधीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्या कोरोना योद्यांचा सन्मान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरिक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, फौंडेशनचे अध्यक्ष सचिन कांबळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी अमित माने, ओंकार यादव, लैलेश फडतरे, स्वप्निल कुंभार, राहुल चव्हाण, वैशाली गुरव, हसन तडवी, पंकज मोहिते, वाहतूक शाखेचे जितेंद्र जाधव, सातारा पालिकेतील आरोग्य कर्मचारी संदीप पाटसुते, कपिल मट्ठू, अमोल खंडुझोडे, तुकाराम खंडुझोडे, लक्ष्मण कांबळे, विकास जाधव, चंद्रकांत खुडुझोडे, गणेश जाधव, अजय शिंदे, सुनिल गांदले, निसार कच्छी, अक्षय अवघडे, तानाजी वाघमारे, सागर वायदंडे, प्रशांत दोरके, चैतन्य सणस, दिपक भोसले आदींचा सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.