महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / मायणी :मंगेश भिसे
खटाव माणचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी आगामी पदवीधर मतदारसंघातील निवडणूक लढवावी अशी मागणी सातारा-सांगली-पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.डॉ. दिलीप येळगावकर यांनी १९९६ मध्ये विद्यापीठाची ‘ सिनेट ‘ ची निवडणूक लढवून जिंकली होती. ६ वर्षे येळगावकर सिनेट मेम्बर होते.या कालखंडात त्यांनी विद्यापीठातील अनेक विषयातील प्रलंबित प्रश्न सोडवले होते.
२००४ साली नंबर २ च्या मताधिक्याने विधानसभेत गेल्यानंतर शपथ ग्रहण करताना माण-खटाव च्या दुष्काळी शेतीपाणी प्रश्न सोडवण्याची शपथ घेतली होती. पाणीप्रश्नासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली एवढंच काय परंतु विधानसभेच्या पायरीवर बसून आंदोलन करणारा हाच नेता होता. पदवीधर मतदाराचे अनेक प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत पदवी आहे . पण नोकरी नाही .उद्योगधंदा करायचे म्हंटले तर बीजभांडवल नाही , बँकेकडून उपलब्ध करायचे म्हंटले तर बँकेचा नकारघंटा असतो,अन असे कित्येक प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत पडले आहेत. यासाठी विधानपरिषदेत ‘ खमक्या ‘ आमदार पाहिजेत. या भावना पदवीधर मतदारांची झाली आहे.
डॉ. दिलीप येळगावकर हे पदवीधरांना नक्कीच न्याय मिळवुन देतील त्यांची फळी निर्माण करतील असा विश्वास निर्माण झाल्यानेच कार्यकर्त्यांचा आग्रह वाटू लागला आहे. याबाबत डॉ. दिलीपराव येळगावकर यांची भूमिका काय ते आता पहावे लागेल.