अरुण गाडे यांची पुढील 5वर्षासाठी काष्ट्राइबच्या अध्यक्षपदी एकमताने निवड
राज्यकर्ते बहुजन व मागासवर्गीय निर्णय घेत आहे. डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा दिलेला अधिकार काढून शासनाने राज्यातील ६२ हजार शाळा बंद करून उद्योगपतीच्या घश्यात घालून शिक्षणाचा बट्याबोळ केला. त्यामुळे बहुजनाचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवन्याचे कटकारस्थान करण्यात येत आहे . कर्मचाऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले जात आहे 2010पासून कर्मचारी भर्ती बंद आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरली नाहीत,खाजगीकरण व कंत्राटी पद्धतीमुळे कर्मचारी भरडल्या जात आहे, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीं नाहीं त्यामुळे तरुण वैफल्यग्रस्त आहे एकूणच देशात मनुवादी व भांडवलशाही व्यवस्था निर्माण करून सर्व बहुजनावर गुलामी लादली जात आहे, त्यासाठी सध्याचे सरकार जबाबदार आहे, असे बहुजनविरोधी सरकार बदलावण्या चीगरज असून असे सरकार बदलण्याची ताकद कर्मचारी संघटनात आहे सर्व संघठनांनी संघटित व्हावे असे प्रतिपादन अरुण गाडे यांनी काष्ट्राईब महासंघाच्या राज्य अधिवेशन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
अधिवेशनाचे उद्घाटक जेष्ठ कामगार नेते काम्रेड डाँ डी एल कराड यांनी केले विचामांचावर मा. अशोक दगडे,शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, जेष्ठ साहित्यिक शिवा इंगोले व जिल्हा शल्य चिकित्सक डाँ बाळासाहेब सोनवने जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ मनोहर बनसोडे, डाँ दत्ता तपसे, अनिल धांडे, एकनाथ मोरे, श्यामराव हाडके, यशवंत माटे, डाँ हरिसचंद्र रामटेके, संजय धनगर, भीमराव घोरपडे उपस्थित होते, या प्रसंगी उदघाटक डाँ डी एल कराड यांनी देशातील कामगार याची शोषणातुन मुक्तता करणे तसेच शोषण करणारं कंत्राटी धोरण हद्दपार कारण्यासाठी राष्ट्रीय चालवळलं राबविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले, कर्मचारी नेते अशोक दगडे यांनी महाराष्ट्रातील कर्मचारी चळवळीचा इतिहास नमूद करून मध्यवरती संगठना व इतर संघटनानी एकत्र येऊन पेन्शन बाबतचा लढ्या मुळे सरकारने मागणी मान्य केली इतरही मागण्यासाठी संघटितपणे लढा देण्यासाठी कर्मचारी संघटनानी एकत्र असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या अधिवेशनात अरुण गाडे यांची काष्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष म्हणून पुढील पाच वर्षाकरिता एकमताने फेरनिवड करण्यात आली.
अधिवेशन मध्ये कामगार कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांच्या समस्या व उपाय यावर चर्चा सत्र कर्मचारी नेते अशोक दगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. चर्चा सत्रात, पवन वासनिक व शिक्षक संघटनेच्या वक्त्यांनी मार्गदर्शन केले
विचार मंचावर अनेक संघटना कामगार नेते उपस्थित राहून प्रत्येकाने आपले विचार व्यक्त केलेत. कार्यक्रमाचे भूमिका डाँ दत्ता तपसे यांनी तर संचालन डाॅ. विद्या शिर्के यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अनिल धांडे यांनी केलेत. ठाणे,दुसऱ्या सत्राचे संचालन सीताराम राठोड यांनी केले,
अधिवेशनाल संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई व कोकण विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम केलेत.
विनीत -रवी पोथारे




















