साखरवाडी दिनांक १. एप्रिल रोजी पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल साखरवाडी होळ सर्कल येतील कुमारी. माधुरी जाधव हिचा सत्कार होळ सर्कल येथील ढगाई देवी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दिलीप( काका) भोसले युवानेते ओंकार भोसले( वारकरी )व सोसायटीच्या विद्यमान सदस्य विजया भोसले (वारकरी )यांच्या वतीने करण्यात आला.
माधुरी जाधव हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पी एस आय पदावर पोहोचल्याचे कौतुक साखरवाडी परिसरातून होत आहे२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्या फेरीत उत्तीर्ण होऊन माधुरी जाधव हिने यश संपादन केलेनांदल तालुका फलटण येथील छत्रपती अकॅडमी येथे पीएसआय पदाचे प्रशिक्षण घेऊन फलटण नगरपरिषदेच्या भाऊसाहेब जाधव अभ्यासिकेत तिने या परीक्षेचा अभ्यास करून मेहनतीने संपादन केल्याबद्दल साखरवाडी फलटण तालुक्यातून माधुरी जाधव व तिचे वडील दसरथ जाधव एसटी चालक म्हणून काम करत आपल्या मुलीला पीएसआय पदावर नेण्या परिंचे कष्ट केले तसेच माधुरी च्या आईने शेतमजुरी करून आपल्या मुलीला मोलाची साथ दिल्याबद्दल या कुटुंबाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.