डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेचा विचार जनसामान्यपर्यँत पोहचविण्यासाठी व त्याअनुषंगाने अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या हेतूने डाँ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे या संस्थेची 12डिसेंबर 1978ला स्थापना करण्यात आली. बार्टी द्वारा अनुसूचित जातीच्या विध्यार्थीसाठी यूपीएस-एमपीएससी परीक्षेसाठी प्रशिक्षण दिल्या जाते तसेच पोलीस मिल्ट्री, बँक, एल आय सी, रेल्वे साठीच्या स्पर्धा परीक्षसाठी प्रशिक्षण दिल्या जाते, अनेक शिष्यवृत्ती दिली जाते.बार्टी द्वारा अधिछात्रवृत्ती BANRF सुरु करण्यात आले व या योजने अनतंर्गत 200 विदर्थ्यांना 35हजार रुपये महिना प्रमाणे 5वर्ष फेलोशिप दिल्या जाते. परंतु 2018पासून सरसकट फेलिशिप दिली नाही व हा पैसा भीमा कोरेगाव शौर्य दिना निमित्ताने शहीदना मानवदना देण्यासाठी या विदर्थ्यांच्या निधीची लूट सुरु केली आहे. बार्टीचे मुख्य ध्येय अनुसूचित जातीच्या विदर्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देणे आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनामित येणाऱ्या जनतेसाठी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही शासनाच्या विविध विभागाची असताना बार्टी द्वारा जवळपास 14कोटी रुपयांची खैरात खालील प्रमाणे सामाजिक न्याय विभागाने 15/12/2023 आदेशाने मंजुरी दिली आहे
1)पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग -पुणे 4कोटी 35लाख 2)पोलीस अधीक्षक ग्रामीण पुणे (मनुष्य बळ पुरवठा )-1कोटी 49लाख 3)कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग पुणे (पार्किंग व शौर्य स्तंभर्यन्त रस्ता ) -2कोटी 21लाख
4)कार्यकारी अभियंता पूर्व, पुणे (स्टॉल पासूनचे रस्ते )-1कोटी 60लाख
5)पुणे महानगरपालिका (बसेस व्यवस्था )2कोटी 26लाख
6)कार्यकारी अभियंता विद्दूत विभाग, (लाइटिंग व्यवस्था ) -80लाख
7)पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा (ट्राफिक व्यवस्था )-रुपये -39लाख 8)अधीक्षक अभियंता महावितरण ग्रामीण मंडल पुणे -(विदधूत पुरवठा )-10लाख 9)जिल्हाधिकारी, पुणे -4लाख
व असे जवळपास 14कोटी रुपये विदर्थ्यांचं शिक्षण व संशोधन साठी वापरण्या ऐवजी शासनाच्या इतर विभागाला खैरती प्रमाणे वाटणे हे चुकीचे व अन्याय कारक निर्णय बार्टी राबवित आहे. बार्टी मध्ये जातीयवादी अधिकारी असून अनुसूचित जातीच्या. जाती जातीमध्ये संघर्ष पेटविण्याचं कार्य अधिकारी करित आहे. बार्टी तिल भोंगळ कारभार बंद व्हावा.14कोटी रुपये परत बार्टीला देण्यात यावे. Phd विध्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी व बार्टीच्या महासंचालक पदी IAS अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी पत्रकाद्वारे अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राईब महासंग यांनी केली अन्यथा महाराष्ट्र भर काष्ट्राईब तर्फे आंदोलन करण्यात येईल असे अरुण गाडे यांनी सांगितले
–सिताराम राठोड