महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड मधील जनता सहकारी बँक दिवाळखोरीत निघाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. केवळ बँकांच्या नावातील साधर्म्यामुळे कराड अर्बन बँकेला भूतकाळात त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर व चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी केले आहे.
कराड येथील जनता सहकारी बँके पूर्वी सन १९९२ -९३ साली बँक ऑफ कराड ही कराड मधील व्यापारी बँक दिवाळीखोरील निघाली होती.दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराड (शेड्युल्ड बँक) ही बँक वर नमूद केलेल्या दोन्ही बँकांपेक्षा भिन्न आहे आणि कराड अर्बन बँकेची स्थापना सहकाराच्या प्रारंभीच्या काळात म्हणजेच सन १९१७ साली झाली असून, बँकेला १०४ वर्षांची प्रदीर्घ वाटचालीची दैदीप्यमान परंपरा लाभलेली आहे.
त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही अफवा अथवा तिच्या बातम्यांवर विश्वास चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. आपल्या बँकेचे सर्व व्यवहार नियमित सुरू असून, बँक आर्थिक दृष्ट्या अत्यंत सुस्थितीत आहे. आपणास याबाबत काही माहिती हवी असल्यास नजीकच्या शाखेत संपर्क साधावा. असे आवाहनही सीए दिलीप गुरव यांनी केले आहे.






















